मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

व्हाइट हाऊसजवळ कारची धडक; ट्रम्प आत, लॉकडाऊन

अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाजवळ कारने धडक दिल्यानंतर खळबळ उडाली. डोनाल्ड ट्रम्प आत असताना काही काळ लॉकडाऊन घोषित करण्यात आला; चालकाला ताब्यात घेण्यात आले.

व्हाइट हाऊसजवळ कारची धडक; ट्रम्प आत, लॉकडाऊन

अमेरिकेच्या राष्ट्रपती भवनाजवळ एका कारने धडक दिल्याने खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीने आपल्या कारने राष्ट्रपती भवनाला धडक दिली. त्यानंतर त्याने सीक्रेट सर्व्हिसच्या अधिकारी आणि नॅशनल गार्डच्या जवानांशी हाणामारी केली. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली. खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने व्हाइट हाऊसमध्ये काही काळासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आले. ही घटना घडली तेव्हा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाऊसच्या आतच होते.

या घटनेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओनुसार, एक सिल्व्हर सेडान कार लाफायेट स्क्वॉयरच्या उत्तरेकडे बनलेल्या रस्त्यावर आली. एका साइनपोस्टला तिने धडक दिली. या धडकेनंतर गाडीतून सफेद धूर निघताना दिसत आहे. त्यामुळे या परिसरात एकच धावपळ उडाली आणि खळबळ माजली.

सकाळी घडली घटना

स्थानिक वेळेनुसार सकाळच्या दहा वाजता अमेरिकेच्या सीक्रेट सर्व्हिसने व्हाइट हाऊस प्रेस कोरच्या सदस्यांना आत येण्याचे आणि तिथेच थांबण्याचे निर्देश दिले. ही घटना घडली तेव्हा राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे व्हाइट हाऊसमध्येच होते.

चालकाची ओळख अद्याप अस्पष्ट

यावेळी या गाडीतील चालकाने सुरक्षा रक्षकांसोबत हाणामारी केली. त्यानंतर चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, चालकाची ओळख पटलेली नाही. दुर्घटनेचे कारणही समजू शकलेले नाही. तसेच यामागचा हेतूही समजलेला नाही. हा हल्लेखोर आहे की चुकून ही दुर्घटना घडली, याची काहीच माहिती मिळालेली नाही. सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी याचा तपास करत आहेत. अमेरिकन यंत्रणा या व्यक्तीची कसून चौकशी करत आहे.

लाफायेट स्क्वॉयर व्हाइट हाऊसच्या समोरच पेन्सिलवेनिया एव्हेन्यूच्या जवळ आहे. राष्ट्रपती परिसराच्या जवळच हे एक प्रमुख ठिकाण आहे. या ठिकाणी कारने धडक दिल्याने सुरक्षा व्यवस्था सक्रिय झाली आहे. व्हाइट हाऊसच्या परिसरात येण्या-जाण्यास मज्जाव करण्यात आला असून सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

स्रोत: मूळ बातमी

विशाल राजपूत

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance