मुंबईच्या प्रभादेवी परिसरात कामगार मैदानाच्या मागे भीषण आग लागली आहे. आगीचे लोळ आणि काळ्या धुराचे लोट पाहून वर्दळीच्या या भागात नागरिकांची पळापळ झाली.
अग्निशमन दल घटनास्थळी
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी दलाकडून युद्धपातळीवर शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
परिसरात खळबळ
या भीषण दुर्घटनेमुळे प्रभादेवी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. आग नेमकी कशामुळे लागली आणि त्यात किती नुकसान झाले, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply