अनन्या पांडे आणि अक्षय कुमारचा मुलगा आरव भाटिया यांच्या नात्याबद्दल सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. निमित्त ठरलं आहे ते मनीष मल्होत्रा यांच्या दिवाळी पार्टीचं. मनीष मल्होत्राच्या पार्टीत दोघांचं एकत्र दिसणं आणि अनन्याने आरवसोबतचा फोटो शेअर करत दिलेलं खास कॅप्शन यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
दिवाळी पार्टीत एकत्र
६ नोव्हेंबरला मनीष मल्होत्रा यांच्या मुंबईतील घरी दिवाळी पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीला बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित होते. अनन्या पांडे आणि आरव भाटिया हे देखील या सोहळ्यात एकत्र दिसले. अनन्याने आरवसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्यावर तिने ‘माय हार्ट’ असं कॅप्शन दिलं. दोघेही एकमेकांच्या जवळ उभे असल्याचं पाहून चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्यांबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
विशेष म्हणजे, दिवाळी पार्टीच्या आधीही अनन्या आणि आरव परदेशात एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. अनन्याने त्याच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला होता. त्यामुळे पार्टीतील फोटो आणि कॅप्शन समोर आल्यानंतर या चर्चांना उधाण आलं आहे. काही नेटकऱ्यांनी अनन्या आरवला डेट करत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
दोघांचं नातं अद्याप जाहीर नाही
अनन्या आरवपेक्षा ४ वर्षाने मोठी आहे. अनन्याचे वडील चंकी पांडे आणि अक्षय कुमार हे चित्रपटसृष्टीतील जुने आणि खास मित्र आहेत. दरम्यान, अनन्या पांडेचं नाव यापूर्वी परदेशी मॉडेल वॉकर ब्लँकोसोबत जोडलं गेलं होतं. दोघांनी जवळपास दोन वर्ष एकमेकांना डेट केल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे जाहीर केलं नव्हतं. पण त्याचं ब्रेकअप झाल्याचीही बातमी समोर आली होती.
आता आरवसोबतच्या फोटोमुळे अनन्याच्या वैयक्तिक आयुष्याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. मात्र अनन्या आरवला डेट करत आहे, असे दोघांनी अद्याप जाहीर केलेले नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply