दिवाळीच्या सणाला घरासमोर रांगोळी काढण्याची परंपरा जुनी आहे. मात्र शहरांमधील फ्लॅट संस्कृतीत रांगोळीचे स्वरूप बदलत चालले आहे. यंदा वुडन, वुलन आणि मॅट स्वरूपातील रांगोळीला वाढती मागणी असल्याचे दिसून येत आहे.
स्टिकर रांगोळी आणि तोरणांचे स्टिकर्स
बाजारात विविध आकारांतील स्टिकर रांगोळी उपलब्ध आहे. लक्ष्मीच्या पावलांचे स्टिकर्स आणि तोरणांचे स्टिकर्सही विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. कमी वेळात आणि सहजपणे रांगोळी सजवता येत असल्याने अशा प्रकारांना पसंती मिळत आहे.
नक्षीदार छापासाठी चाळण्या
नक्षीदार छाप असलेली रांगोळी काढण्यासाठी चाळण्या बाजारात मिळत आहेत. साधारण १० ते ५० रुपयांपर्यंत या चाळण्यांचे दर आहेत. छोट्या जागेतही रांगोळी सजवता यावी, यासाठी हे पर्याय उपयुक्त ठरत आहेत.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply