दिवाळीचा सण सुरू झाला असून पहिल्याच दिवशी सोने आणि चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. वसुबारसच्या दिवशी सोने-चांदीच्या दरात झालेली वाढ पाहता सणासुदीच्या काळात खरेदीचे नियोजन करणाऱ्या अनेकांचे बजेट बिघडण्याची शक्यता आहे.
२४ तासांत दरात मोठी वाढ
गेल्या २४ तासांत सोन्याच्या दरात तब्बल ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात तब्बल १५ हजार रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. अवघ्या एका दिवसात झालेली ही वाढ ग्राहकांसाठी आर्थिकदृष्ट्या मोठा फटका ठरू शकते.
आजचे दर किती?
मिळालेल्या माहितीनुसार, आज सोन्याचा दर जीएसटीशिवाय १ लाख ४५ हजार रुपये झाला आहे. तर चांदीचा दर जीएसटीशिवाय १ लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचला आहे. ऐन दिवाळीत सोने-चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांचे बजेट या दरवाढीमुळे बिघडण्याची शक्यता आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply