वाढत्या महागाईत मिळणाऱ्या पगारात घर चालवणे खूप कठीण झाले आहे. सणासुदीच्या काळातील खर्च आणि प्रवासाचा वाढता खर्च यामुळे कर्मचाऱ्यांच्या मागण्याही वाढल्या आहेत. त्यातच आठव्या वेतन आयोगात किती वाढ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भत्त्यांमध्ये वाढीची मागणी
कर्मचाऱ्यांची अपेक्षा केवळ मूळ वेतन आणि निवृत्तीवेतनातील वाढीपुरती मर्यादित नाही. घरभाडे भत्ता, प्रवास भत्ता आणि महागाई भत्त्यातही बदल व्हावेत, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात येत आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, या मागण्यांना अद्याप सरकारी मंजुरी मिळालेली नाही.
लेव्हल-१ कर्मचाऱ्यांना दिलासा?
प्रस्तावानुसार घरभाडे भत्त्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच लेव्हल-१ कर्मचाऱ्यांना दरमहा ९ हजार रुपये प्रवास भत्ता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अंतिम निर्णय झाल्यानंतरच या वाढीचे नेमके स्वरूप स्पष्ट होईल.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply