प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर अधूनमधून चर्चेत असतात. मधल्या काळात त्यांची मुलगी गुड्डी ऊर्फ ज्ञानेश्वरीचे लग्न ठरले होते. मुलीचे लग्न ठरल्यापासून ते लग्न होईपर्यंत इंदुरीकर महाराज चांगलेच चर्चेत होते. आता ज्ञानेश्वरीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
ज्ञानेश्वरी ऊर्फ गुड्डी हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती ‘नाचू किती, नाचू किती, कंबर लचकली…’ या गाण्यावर नाचताना दिसत आहे. तिच्यासोबत एक महिलाही नाचताना दिसत आहे. ज्ञानेश्वरीने या व्हिडिओत चांगलाच ठेका धरलेला दिसत आहे. हा व्हिडिओ येताच तो प्रचंड व्हायरल झाला असून त्यावर कमेंटचा पाऊस पडत आहे.
समर्थन आणि टीका दोन्ही
गुड्डीचा हा व्हिडिओ येताच तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसेच तिला ट्रोलही केले जात आहे. काहींनी तिच्या व्यक्तिगत आयुष्याचे स्वागत केले आहे, तर काहींनी तिच्यावरून थेट इंदुरीकर महाराजांवर निशाणा साधला आहे. ‘नाचू द्या की, तिचे लाइफ आहे. तिने काय तिच्या वडिलांसारखी कीर्तने सांगावी का? तरुण मुलगी आहे, नॉर्मल आहे, तिची आवड असेल,’ असे एकाने म्हटले आहे. ‘अंगभर वस्त्र परिधान करून नाचते ती… स्वतःची आवड जपणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. वडील कीर्तनकार असले म्हणजे तिने नाचणे चुकीचे का? नृत्य एक कला आणि छंद आहे. लोक जिथे नाही तिथे ज्ञान द्यायला सुरुवात करतात,’ असे दुसऱ्याने म्हटले आहे.
दुसरीकडे, ‘गावभर पेरले, पण घरातच नाही उगवले. लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण,’ अशी टीका एका व्यक्तीने केली आहे. ‘महाराजांनी आधी स्वतःच्या घरात लक्ष द्यावे, मग बाकी मुलींवर टीका कराव्यात,’ असेही म्हटले आहे.
थाटात पार पडलेला विवाह सोहळा
इंदुरीकर प्रत्येक प्रवचनात लोकांना साध्या पद्धतीने लग्न करायला सांगायचे आणि लग्नाचा बडेजाव करणाऱ्यांवर जोरदार टीका करायचे. पण त्यांनीच मुलीचे लग्न एवढ्या थाटामाटात केले की महाराज आयतेच ट्रोलर्सच्या हाती सापडले होते. प्रचंड ट्रोल झाल्याने त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. ज्ञानेश्वरीच्या लग्नाला आता पाच महिने झाले आहेत आणि तिचा सुखाचा संसार सुरू आहे.
ज्ञानेश्वरी हिचा विवाह ३ मे २०२६ रोजी साहिल चिलप यांच्याशी झाला. साहिल हे प्रसिद्ध उद्योजक सुनील चिलप यांचे चिरंजीव आहेत. ज्ञानेश्वरीने एमसी डीसीसीएसपर्यंत शिक्षण घेतले आहे. दोघांचा विवाह अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील गुंजावाडी शिवारात मोठ्या थाटात पार पडला होता.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply