पीएफमधील पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि वेगवान होण्याच्या मार्गावर आहे. आतापर्यंत पैसे काढण्यासाठी ऑनलाइन क्लेम करावा लागत होता आणि क्लेम मंजूर होऊन पैसे खात्यात जमा होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागत होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना ही प्रक्रिया बदलण्याच्या तयारीत आहे.
ATM आणि UPI मधून थेट पैसे
EPFO 3.0 अंतर्गत कर्मचाऱ्यांना ATM आणि UPI च्या माध्यमातून पीएफचे पैसे काढण्याची सुविधा देण्याची योजना आहे. नव्या डिजिटल व्यवस्थेत पीएफ खाते बँकिंग नेटवर्क आणि ATM प्रणालीशी जोडले जाणार असून, त्यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाशी संबंधित व्यवस्था करण्यात येत आहे. ही सुविधा डिसेंबर 2026 मध्ये अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply