अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी सोमवारी संगमनेर शहरातील एका विद्यालयात मतदान प्रक्रिया सुरू होती. त्याच दरम्यान, मतदान केल्यानंतर मतदाराने कोणाला मतदान केले हे दर्शवणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. या प्रकाराची माहिती मिळताच परिवर्तन पॅनलचे प्रताप ढाकणे यांनी थेट मतदान केंद्रावर धाव घेत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी मतदान केंद्रातच आक्षेप नोंदवत संताप व्यक्त केला.
दोन्ही गटांत शाब्दिक चकमक
ढाकणे यांनी मतदान केंद्रात आक्षेप घेतल्यानंतर थोरात गटाचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. दोन्ही गटांत शाब्दिक वाद झाल्याने काही काळ मतदान केंद्र परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. जिल्ह्यातील दादागिरी संपवावी आणि अशा प्रकारांना थारा देऊ नये, अशी भूमिका ढाकणे यांनी मांडली. त्यावर थोरात गटाच्या कार्यकर्त्यांनी हा व्हिडिओ कधीचा आहे, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, उमेदवारही नसलेल्या आणि मतदारही नसलेल्या व्यक्तीला मतदान केंद्रात हस्तक्षेप करण्याचा अधिकार काय, असा सवाल त्यांनी केला. दादागिरी चालणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.
मतदानाच्या गोपनीयतेवरून खळबळ
मतदाराने कोणाला मतदान केले हे उघड करणारा व्हिडिओ प्रसारित झाल्याने मतदानाच्या गोपनीयतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकाराची दखल घेत ढाकणे मतदान केंद्रावर पोहोचले आणि त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे या प्रकाराबाबत विचारणा केली. वादानंतर काही काळ केंद्र परिसरात तणावाचे वातावरण होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply