राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची आज देवगिरी येथे बैठक होत आहे. पदवीधर आणि शिक्षक विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवाबाबत या बैठकीत आत्मचिंतन केले जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
पराभवावर आत्मचिंतन
नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या जागांवर महायुतीचा पराभव झाला होता. या पराभवाची कारणे आणि त्यातून घ्यायचा धडा यावर बैठकीत चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच गोकुळ निवडणुकीबाबतही या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती आहे. बैठकीतून पुढील रणनीतीबाबत महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply