नवी दिल्लीत इंडिया आघाडीच्या सभेदरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भाजपच्या लोकांवर गंभीर आरोप केला. कॅनॉट प्लेस येथील व्यापाऱ्यांची दुकाने भाजपच्या लोकांनी जबरदस्तीने बंद केली, असा दावा त्यांनी केला. आंदोलनात सहभागी होणाऱ्या लोकांनी व्यापाऱ्यांकडून वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन आपण केले होते, मात्र भाजपवाल्यांनी दुकाने बंद केल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाल्याचे गांधी म्हणाले.
व्यापाऱ्यांचे आवाहन आणि सभेची पार्श्वभूमी
मतदारयादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाची (एसआयआर) मोहीम रद्द करावी तसेच ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटवावे, या मागणीसाठी काँग्रेसने रामलीला मैदानावर सभेचे आयोजन केले होते. दिवाळी तोंडावर असल्याने ही सभा नंतर घ्यावी, असे आवाहन व्यापारी संघटनांनी राहुल गांधी यांना केले होते. मात्र सभा पुढे ढकलण्यास गांधी यांनी नकार दिला होता.
आपल्या मागण्या मान्य झाल्यास तीस सेकंदांत आंदोलन बंद केले जाईल, असे उत्तर गांधी यांनी व्यापाऱ्यांना दिले होते, असेही सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर भाजपच्या लोकांनी व्यापाऱ्यांची दुकाने बंद केल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे. व्यापाऱ्यांचे नुकसान कोण आणि कसे करत आहे, ते पाहा, असे म्हणत गांधी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओही शेअर केला आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply