भारतात रेल्वेचे मोठे जाळे आहे. काश्मीर ते कन्याकुमारी असा कुठलाही प्रवास करायचा असेल तर त्या भागात रेल्वेने जाता येते. रेल्वेने केलेला प्रवास सर्वात सुरक्षित मानला जातो, त्यामुळे रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. प्रवास सोपा आणि सोयीचा व्हावा यासाठी रेल्वे विभागाकडून नियमांमध्ये वेळोवेळी बदल केले जातात. असाच एक महत्त्वाचा नियम आहे. हा नियम माहिती नसेल तर तिकीट मिळणे कठीण होऊ शकते.
महत्त्वाचा नियम नेमका काय?
आयआरसीटीसीच्या अॅपवर किंवा संकेतस्थळावर जाऊन रेल्वेचे तिकीट बुक करत असाल तर हा नियम माहिती असणे गरजेचे आहे. हा नियम आगाऊ तिकीट बुकिंगसंदर्भात आहे. या नियमानुसार प्रवासाच्या ६० दिवसांअगोदरच तिकीट बुक करता येते. आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी याआधी १२० दिवसांचा होता.
या नियमाचा फायदा काय?
अगोदर प्रवासाचे तिकीट १२० दिवसांअगोदरच बुक करता यायचे. आगाऊ तिकीट बुकिंगवरच लागू असलेला हा नियम ६० दिवसांचा करण्यात आला. या नियमामुळे प्रवाशांना खूप फायदा होतो. काही लोक अगोदरपासूनच तिकीट बुक करून ठेवायचे, त्यामुळे इतर प्रवाशांची अडचण व्हायची. ही अडचण होऊ नये म्हणून आगाऊ तिकीट बुकिंगचा कालावधी कमी करण्यात आला आहे. हा नियम २०२४ सालीच बदलण्यात आला आहे.
त्यामुळे आगाऊ नियोजन करताना प्रवाशांनी ६० दिवसांचा हा कालावधी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यापेक्षा आधी तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केल्यास तिकीट मिळणार नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply