सोशल मीडिया, मोबाईल, यूट्यूब किंवा इंस्टाग्रामवर तुम्ही अनेकदा 1K, 10K, 100K किंवा 1M असे आकडे पाहिले असतील. एखाद्या खात्याला किती लोक फॉलो करतात, हे 25K किंवा 50K अशा स्वरूपात दिसतं. एखाद्या व्हिडिओला किती व्ह्यूज मिळाले, हेदेखील 2K किंवा 5K असंच सांगितलं जातं. इथे K चा अर्थ हजार असा होतो.
मात्र इथे एक प्रश्न निर्माण होतो. हजार या अर्थाच्या इंग्रजी शब्दाची, म्हणजे Thousand या शब्दाची सुरुवात T या अक्षराने होते. मग हजार दर्शवण्यासाठी T ऐवजी K का वापरला जातो? हे K नेमकं कुठून आलं, याचं उत्तर इतिहासात दडलं आहे.
K चा उगम प्राचीन ग्रीक भाषेत
K हा शब्द प्राचीन ग्रीक भाषेमधून आला आहे. ग्रीक भाषेत हजार या अर्थासाठी खिलियोई (Khilioi) हा शब्द वापरला जायचा. त्यातूनच K हे अक्षर घेण्यात आलं आहे. त्या काळात हा शब्द गणितीय मोजमापासाठी वापरला जात होता, असं सांगितलं जातं.
आजच्या वापरात K
आजच्या काळातही हा शब्द जसाच्या तसा वापरला जातो आणि विविध व्यवहारांमध्ये तो चांगलाच लोकप्रिय झाला आहे. 15K, 20K, 40K, 50K फॉलोअर्स किंवा 5K व्ह्यूज अशा स्वरूपात तो सर्रास वापरला जातो. त्यामुळे Thousand हा शब्द T ने सुरू होत असला, तरी हजार दर्शवण्यासाठी K हे अक्षर ग्रीक भाषेतील खिलियोई या शब्दातून आलं आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply