शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

पाच गावांना अचानक भेटी; विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी

चोपडा तालुक्यातील पाच गावांना मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी अचानक भेटी देऊन ग्रामपंचायत कामकाजाची व शासकीय योजनांच्या अंमलबजावणीची तपासणी केली.

पाच गावांना अचानक भेटी; विकासकामांची प्रत्यक्ष पडताळणी

ग्रामपंचायतींना थेट १५ व्या वित्त आयोगाचा निधी मिळत असून त्यातून विकासकामे केली जातात. त्यानुसार वित्त आयोगांतर्गत झालेल्या कामांची कागदोपत्री नोंद आणि प्रत्यक्ष कामांची स्थिती यांची पडताळणी करण्यात आली. तसेच जनसुविधा व मूलभूत सुविधा योजनांतर्गत करण्यात आलेल्या विकासकामांची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी केली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांनी चोपडा तालुक्यातील घुमावल बुद्रुक, गोरगावले बुद्रुक, लासूर, गणपूर आणि अकुलखेडा या गावांना अचानक भेटी देऊन ग्रामपंचायत स्तरावरील कामकाजाची तपासणी केली. तसेच विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामपंचायतींच्या अभिलेखांची तपासणी केली.

घरकुल योजनांचा आढावा

ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा एक व टप्पा दोन तसेच रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि मोदी आवास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात आलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली. तसेच दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर व्ही. जी. रामजी योजनेंतर्गत आवश्यक कामे शेल्फवर घेऊन सुरू करण्याबाबत यंत्रणेला सूचना देण्यात आल्या.

शाळा, अंगणवाडी आणि आरोग्य उपकेंद्रांची पाहणी

दौऱ्यादरम्यान श्रीमती नायर यांनी जिल्हा परिषद शाळांना भेटी देऊन शाळांमधील स्वच्छतागृहांची स्थिती आणि उपलब्ध सुविधांची पाहणी केली. तसेच विविध अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. गोरगावले बुद्रुक आणि लासूर येथील आरोग्य उपकेंद्रांची तपासणी करून आरोग्य सेवांचा आढावा घेण्यात आला.

प्रत्येक ग्रामपंचायतीत २०० जलतारा शोषखड्डे

पावसाचे पाणी जमिनीत मुरवून भूजलपातळी वाढविणे आणि जलसंधारणाला चालना देणे, या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीने किमान २०० जलतारा शोषखड्डे तयार करण्याच्या सूचना दिल्या. जलसंधारणाच्या कामांमध्ये लोकसहभाग वाढवून गावपातळीवर पाण्याच्या उपलब्धतेसाठी ठोस उपाययोजना करण्यावर त्यांनी भर दिला.

स्रोत: मूळ बातमी

प्राची शिंदे

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance